Nashik Bus Accident

Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात ST बस दरीत कोसळली; 15 जण जखमी

1753 0

नाशिक : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज सकाळच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात (Nashik Bus Accident) झाल्याची घटना ताजी असताना आता वणी घाटात बस कोसळून भीषण अपघात (Nashik Bus Accident) झाला आहे. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला आहे तर पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण 28 प्रवासी प्रवास करत होते.

Accident News : समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; 20 जण जखमी

बस घाटात कोसळल्यानंतर स्थानिकांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. अपघातग्रस्त झालेली बस ही खामगाव डेपोची आहे. सप्तश्रृंगी घाटामध्ये या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Andhra Pradesh Accident : बस कॅनॉलमध्ये पडून भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू

या अपघातातील (Nashik Bus Accident) जखमींना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!