Nandurbar News

Nandurbar News : नंदुरबारमध्ये जिवाभावाच्या मैत्रिणींचा करुण अंत

372 0

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar News) नवापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तालुक्यातील बोरपाडा धरणात जिवलग मैत्रिणींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
उज्वला जयंत्या गावित (वय 16) व मिखा सानु गावित (वय 16) असे मृत पावलेल्या मैत्रिणींची नावे आहेत. या दोघीही बेडकी येथील रहिवाशी होत्या. घटनेच्या वेळी त्या बोरपाडा धरणाच्या किनारी आंघोळीला गेल्या होत्या. बोरपाडा धरणाच्या किनारी दगडावर बसुन आंघोळ करीत असताना या दोघींचा पाय घसरून अचानक तोल गेला आणि त्या पाय घसरून धरणातील खोल पाण्यात पडल्या. ही घटना घडली तेव्हा परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळून शकली नाही व त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व मुलींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही मुलींचे मृतदेह धरणाच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मृत उज्वला हिच्या पश्चात आई वडील चार बहिणी असा परिवार आहे. तर मृत मिखाच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. या दोन्ही मैत्रिणींचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Firoz Khan : ‘भाभीजी घर पै है’ फेम फिरोज खान यांचे निधन

Cyclonic Update : प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

Dombivali Fire : डोंबिवलीतील कंपनीत भीषण स्फोट; अनेक इमारतीच्या काचा फुटल्या

Car Accident : भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं अन् 4 सेकंदात खल्लास; अपघाताचा Live Video आला समोर

Jalna News : अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; भरतीसाठी प्रशिक्षण घेताना तरुणाने ग्राऊंडवरच सोडला जीव

Pune News : पुणे रेल्वे स्थानकातील एफओबीवर मनोरुग्ण चढला; Video व्हायरल

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!