नांदेड : राज्यात मागच्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी चे प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये आता नांदेडमधून (Nanded Police) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. यामध्ये (Nanded Police) कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणाऱ्या दोघांना पोलिसांनी आपला चांगलाच हिसका दाखवला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नांदेड जिल्ह्यात भाईगिरी करणारे व्हिडिओ अपलोड करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. भाईगिरीवर रॅप साँग तयार करणाऱ्यांना नांदेड पोलीसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. रॅप साँग बनवणाऱ्या युवकांना अटक करून त्यांच्या माफीचा व्हिडिओ काढून पोलीसांनी तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. कैद्यांचे कपडे घालून तीन युवकांनी रॅप साँग तयार केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आपल्या पोलिसी खाक्या दाखवल्या.
एम एच 26 बोले तो पुरा गँगस्टरोका एरिया, स्कूल मे ही थी मेरे हाथो मे हतकडीयां, हम लेने आये हप्ता असे शब्द असलेले रॅप साँग तयार करुन या युवकांनी समाज माध्यमावर टाकले होते. मात्र त्यांना आता त्यांनी केलेली भाईगीरी चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Nanded Police) थेट गुन्हा दाखल केला आहे. या तरुणांना माफी मागायला लावून त्यांचा व्हिडिओ पोलीसांनी व्हायरल केला आहे.
अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीच्या व्हिडिओची क्रेझ
अल्पवयीन मुलांमध्ये व्हिडिओ तयार करुन ते युट्यूबवर व्हायरल करण्याची ‘क्रेझ’ पाहायला मिळत आहे. तर अनेकजण साउथमधील चित्रपट पाहून त्या पद्धतीने भाईगिरी करणारे व्हिडिओ देखील तयार करत आहे. अशा व्हिडिओला अधिक रिच मिळत असल्याने हातात देशीकट्टा, पिस्टल बाळगणारे व्हिडिओ तयार केले जातात. त्यामुळे सध्या सोशल मिडीयावर स्वतःला दादा, भाई, डॉन म्हणवून घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण याच मोहात शाळकरी अल्पवयीन मुलं देखील अडकत आहे. त्यामुळे याचे गंभीर परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.