Congress

Congress : नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत नाना पटोलेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

569 0

नागपूर : काँग्रेसमध्यल्या (Congress) गटातटाचं राजकारण हे नेहमीच पाहायला मिळत असतं. अनेकदा काँग्रेसमधीलच काही गट एकमेकांचा विरोध करताना दिसत असतात. अशातच आता नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नागपुरात आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंचावर उपस्थित होते. नाना पटोले यांच्यासोबत काँग्रेसचे महत्त्वाचे नेते देखील बैठकीत उपस्थित होते. मात्र नेहमीप्रमाणे अंतर्गत वाद आणि कलह या बैठकीत दिसून आला. प्रदेशाध्यक्षांसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

काय घडले नेमके?
नागपुरात काँग्रेसची बैठक सुरू असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जीचकार यांच्यात जोरदार राडा झाला. यामुळे प्रदेशाध्यक्ष समोर झालेल्या या राड्या नंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसे प्रमुख नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असतानी सुद्धा दोन्ही बाजूने कोणीही ऐकायला तयार नसताना एकमेकांचे समर्थक आपसात भिडले.त्यामुळे बैठक थांबून एकच राडा सुरू झाला. सध्या या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!