Mumbai News

Mumbai News : मुंबई हादरली! वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

701 0

मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Mumbai News) वरळी सी फेसवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका गोणीत हा मृतदेह आढळून आला होता. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत या अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मृत तरुणीचे वय साधारण 18 ते 30 वर्षे असल्याचे समोर आले आहे.

NCP News : अजित पवार आणि शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संपूर्ण यादी आली समोर

काय आहे संपूर्ण प्रकरण?
वरळी सी फेसवर एका गोणीत तरुणीचा मृतदेह आढळून आला (Mumbai News) आहे. या तरुणीचं वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Beed News : गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ड्युटीवर जाताना दोघा प्राध्यापकांचा जागीच मृत्यू

वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती वरळी पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!