ठाणे : आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी 20 जून रोजी पालिका अभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. पेंकरपाडा भागात एका नागरिकाने घरात केलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेनं कारवाई केली. हे बांधकाम हा नागरिक स्वत: तोडण्यास तयार असताना पालिकेनं का कारवाई केली? असा सवाल स्थानिक आमदार गीता जैन यांनी केला होता. याचवेळी बोलताना जैन (Geeta Jain) यांना राग अनावर झाल्याने त्यांनी अभियंत्याच्या कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यावरून आमदार गीता जैन यांच्यवर टीकादेखील करण्यात आली होती.
Court Summons : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना सन्मस. 14 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
ही अपडेट आली समोर?
मिरा-भाईंदर महापालिकेच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण झाल्याप्रकरणात आमदार गीता जैन यांच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा काशी मिरा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी अर्ज करण्यात आला. कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनी मारहाण प्रकरणी आमदार गीता जैन यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी या पत्रात केली होती. मात्र आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपक्ष आमदार गीता जैन यांच्याविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात तोडगा काढण्याची मागणी करणारे अभियंता शुभम पाटील यांनी गीता जैन यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे.