आपला महाराष्ट्रक्राईमपुणेव्हिडिओ

Maratha Reservation Protest : पुण्यात मराठा आंदोलकांनी मुंबई- बंगळुरू महामार्ग रोखला; वाहतूक पूर्णपणे ठप्प

पुणे : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Protest) लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. राज्यात काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. मोठ्या प्रमाणात गाड्यांची जाळपोळ केली जात आहे. काही नेत्यांची घरे, कार्यालये जाळली जात आहेत. त्यातच आता पुण्यातदेखील मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठा आंदोलकांनी हिंसक भूमिका घेत मुंबई – बँगलोर महामार्ग रोखून धरला आहे. नवले पुलावर मराठा बांधवांनी टायर जाळून सरकारविरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुमारे 7-8 किलोमीटरपर्यंत या रांगा रांगा लागल्या आहेत.