Nashik News

Nashik News : तलाठी परीक्षेचा पेपर फुटला; नाशिकमधून एकाला अटक

629 0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून (Nashik News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये (Nashik News) तलाठी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या म्हसरुळ परिसरात असलेल्या परीक्षा केंद्राबाहेर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपी तरुणाकडून वॉकी टॉकी, मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच संबंधित तरुणाच्या मोबाईमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटोदेखील आढळून आले आहेत.

काय घडले नेमके?
गणेश शामसिंग गुसिंगे असं आरोपी तरुणाचे नाव आहे. नाशिकच्या म्हसरुळ परिसरातील परीक्षा केंद्राबाहेरून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकाही आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात रात्री म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या परसोडातील रहिवासी आहे.

पोलिसांनी या प्रकरणात गणेश गुसिंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एखादे रॅकेट कार्यरत असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!