SANTOSH DESHMUKH | संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ‘तो’ व्हिडीओ सीआयडीच्या हाती

660 0

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून CID ला संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ मिळाला आहे. यासोबतच आरोपींच्या गाडीत दोन मोबाईल देखील सापडल्या असून या मोबाईलवरून एका वरिष्ठ व्यक्तीला फोन केला गेला असल्याचं बोललं जात आहे

नेमकं प्रकरण काय

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभर पडसाद

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदारांना एक बॉडीगार्ड आणि वाल्मीक कराड यांना दोन बॉडीगार्ड कसे? असा सहभाग विधानसभेत उपस्थित करत वाल्मीक कराड आणि या प्रकरणातील आरोपींचे सीडीआर रिपोर्ट तपासा अशी सरकारकडं मागणी केली. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली. तर सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळ ही हत्या किती क्रूरपणे केली याची माहिती सभागृहाला दिली. सरपंच देशमुख यांच्या अंगावर मारहाण झालेले काही कथित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकही आक्रमक झाले.

हे ही वाचा 👇

SANTOSH DESHMUKH: संतोष देशमुख यांना न्याय मिळवुन देण्यासाठी बीडच्या मोर्चात सहभागी होणार; वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंचे नाव घेऊन संभाजीराजेंची पोस्ट

संतोष देशमुख हत्या प्रकरण: तपासात कुचराई केल्याप्रकरणी एसपी बारगळ यांच्या अडचणीत वाढ; तुरुंगवास होणार ?

SANTOSH DESHMUKH | संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; विष्णू चाटेला अटक

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे डोळे जाळले गेले का? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण

BEED CRIME: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून

https://topnewshindi.in/chance-of-becoming-mla-minister-from-pune-district/

Share This News
error: Content is protected !!