MUMBAI ATS NEWS : मुंबईतील भाड्याच्या खोलीत "ते" 16 जण नेमकं काय करत होते ?

MUMBAI ATS NEWS : मुंबईतील भाड्याच्या खोलीत “ते” 16 जण नेमकं काय करत होते ? पोलिसही चक्रावले

364 0

राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिक आढळून येत आहेत. अशातच आता महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस/ ATS) मुंबई (Mumbai) मधील भाड्याच्या एकाच खोलीत राहणाऱ्या 16 बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली आहे. हे सर्वजण अवैधरित्या भारतात घुसखोरी करून राहत असल्याचं आढळून आलं आहे.

एटीएसने सुरू केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान या लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी पोलिसांनी 7 पुरुष आणि 6 महिलांना अटक केली आहे. हे सर्वजण बेकायदेशीर रित्या भारतात आले असून त्यातील तिघांकडे आधार कार्ड सारखी बनावट ओळखपत्र देखील आहेत. भारतात बेकायदेशीरपणे काम करता यावे यासाठी त्यांनी हे सगळं केल्याचं बोललं जात आहे.

कोलकत्यातही घुसखोर

महाराष्ट्र प्रमाणेच कोलकत्ता भागातही अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत आहेत. नुकतंच कोलकाता पोलिसांनी शहरातील पार्क स्ट्रीट परिसरातून एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडे बनावट भारतीय ओळखपत्र असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share This News
error: Content is protected !!