काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मातृशोक;मीराबाई पटोले यांचं निधन

237 0

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई पटोले यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव शरिरावर भंडारा जिल्ह्यातील सोकाली या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

विविध राजकीय नेत्यांनी मीराबाई पटोले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!