Maharashtra ATS

Maharashtra ATS : ठाण्यातून एका गुप्तहेराला अटक; ATS ची मोठी कारवाई

610 0

ठाणे : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून एकाला (Maharashtra ATS) अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच ATS ने ही मोठी कारवाई केली आहे. आरोपीने माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्विकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एप्रिल-मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वर तो संपर्कात होता. एटीएसने चौकशी केल्यानंतर चौघांना अटक केली आहे. महाराष्ट्र ATS या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

गौरव पाटील असे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातून अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. 23 वर्षीय गौरव पाटील नोवल डॉक येथे कामाला होता. गौरव मागील चार ते पाच महिन्यांपासून पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्कात होता. त्याने माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्विकारल्याचे एटीएसने सांगितले आहे.पाकिस्तानचा गुप्तहेर हा गौरव पाटीलसोबत अजून 3 जणांच्या संपर्कात आहे. याप्रकरणी एटीएसने चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळं राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Lok Sabha : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

Aadhar Card : आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!