Pune News : 10 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान संपन्न होणार 13 वी भारतीय छात्र संसद; एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट तर्फे आयोजन

485 0

पुणे : डॉ.स्नेहल रशीद, कवी मनोज मुंतशीर, राज्य सभेचे खासदार मनोज कुमार झा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य व अभिनेत्री खुशबू सुंदर, मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील आभा सिंग, डॉ.टेसी थॉमस आणि राज्य सभेच्या सदस्य डॉ.फौजिया खान यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर तीन दिवस चालणार्‍या या १३व्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्रोत्यांना संबोधित करणार आहेत.

Pune News

जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, श्री. तुषार गांधी, प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, जस्टिस एन. संतोष हेगडे, डॉ. विजय भटकर आणि नानीक रुपानी हे या छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संस्थापक आहेत.

सविस्तर माहितीसाठी www.bharatiyachhatrasansad.org या संकेतस्थळांना भेट द्यावी. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावे.

भारतीय छात्र संसदेविषयी :
तरुण पिढीच्या मानसिकतेत क्रांतीकारक बदल घडवून आणणे, राष्ट्र व समाज निर्मितीच्या कार्यासाठी सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा देणे, या हेतूने 2011 मध्ये भारतीय छात्र संसदेचा प्रारंभ झाला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष आणि भारतीय छात्र संसदेचे संस्थापक प्रा. राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संकल्पक व समन्वयक आहेत. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे या छात्र संसदेचे मार्गदर्शक आहेत. छात्र संसद हा अ-राजकीय उपक्रम असून, त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.

 

Share This News

Related Post

Pune Koyta Gang

Pune Koyta Gang : “कोयता दाखवत फुकट चॉकलेट दे” म्हणणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी काढली धिंड

Posted by - July 20, 2023 0
पुणे : पुण्यात सध्या कोयता गॅंगचा (Pune Koyta Gang) सुळसुळाट सुरु आहे. विविध गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी हे कोयताधारी गुंड (Pune…

Safe India Hero Plus Award : अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांचा मुंबईत सत्कार

Posted by - August 26, 2022 0
मुंबई : आग असो वा आपत्ती अशावेळी कर्तव्य बजावत नागरिकांच्या जिविताची व मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी चोख बजावणारे असे हे…

खुनाचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तिघा सराईतांना अटक

Posted by - May 10, 2022 0
पुणे- खुनाचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली.  रणजित…

प्राधिकरणांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर गदा नको महामेट्रोला प्राधिकरणाचा दर्जा तात्पुरता द्या – माजी उपमहापौर आबा बागुल

Posted by - October 29, 2022 0
पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत कुणालाही कोणतेही काम करताना परवानगी घेणे घटनेनुसार बंधनकारक आहे. त्यामुळे प्राधिकरणांची निर्मिती करताना स्थानिक…

कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदी केशर पवार तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर बिनविरोध

Posted by - April 4, 2022 0
पुणे- पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची सन 2022-2027 च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी महिला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *