मुंबई : लोअर परळमधील कमला मिलमध्ये लिफ्टला भीषण अपघात (Lift collapses in Mumbai) झाला आहे. संबंधित लिफ्ट चौथ्या माळ्यावरून कोसळली (Lift collapses in Mumbai) असून यामध्ये 15 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Mumbai | 12-14 people were injured in an elevator collapse incident in the Trade World building, Lower Parel: BMC
— ANI (@ANI) June 21, 2023
काय घडले नेमके?
लोअर परळमधील कमला मिलमधील ट्रेड वर्ल्ड इमारतीमधील एक लिफ्ट कोसळली. या अपघातात (Lift collapses in Mumbai) 12 ते 14 जण जखमी झाले आहेत. ट्रेड वर्ल्ड इमारतीच्या सी- विंगमधील लिफ्ट चौथ्या मजल्यावरून ही लिफ्ट कोसळली. ही इमारत 16 मजल्यांची आहे. या अपघातातील जखमींना सुरक्षा रक्षकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. जखमीपैकी 8 जणांना परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Eknath Shinde : …तर शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबई अग्निशमन दलाला याची मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींपैकी चौघांना किरकोळ (Lift collapses in Mumbai) दुखापत आहे, उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. तसेच सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. प्रियांका चव्हाण, प्रतीक शिंदे, अमित शिंदे, मो. रशीद, प्रियांका पाटील, सुधीर सहारे, मयूर गोरे, तृप्ती कुबल अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.