latur Doctor

अरे बापरे! चक्क सुरक्षा रक्षकाने रुग्णाला दिले इंजेक्शन; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

703 0

लातूर : रुग्णालयांमध्ये अनेकदा हलगर्जीपणामुळे काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. वेळेत उपचार न मिळाल्याने किंवा चुकीच्या उपचारांमुळे रुग्ण दगावल्याच्या घटना आपण पाहिल्या किंवा ऐकल्या असतीलच. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये रुग्णाला चक्क सुरक्षा रक्षक इंजेक्शन आणि सलाईन लावत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वाला या गावचे रहिवाशी शब्बीर शेख हे अपघातात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांना वॉर्ड क्रमांक 27 मध्ये दाखल करण्यात आले होते. या वेळी त्यांना डॉक्टर तपासून गेले. यावेळी डॉक्टरांनी नर्सला सलाईन आणि इंजेक्शन देण्याचे निर्देश दिले. मात्र त्या नर्सने चक्क सुरक्षा रक्षकाला सलाईन आणि इंजेक्शन देण्यासाठी सांगितले. यावेळी सुरक्षा रक्षक उपचार करत असताना पेशंट च्या नातेवाईकांनी विरोध ही केला मात्र सुरक्षा रक्षक उपचार त्यांचे काही न ऐकता उपचार करतच राहिला.

या प्रकरणी पेशंटच्या नातेवाईकांनी याबाबत डॉक्टरकडे तक्रार केली. तेव्हा डॉक्टरांनी येऊन उपचार केले आणि नर्ससह सुरक्षा रक्षक यांना झापले. या प्रकरणाची गंभीर दखल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ उदय मोहिते यांनी घेतली आहे. या प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Share This News
error: Content is protected !!