latur Doctor

अरे बापरे! चक्क सुरक्षा रक्षकाने रुग्णाला दिले इंजेक्शन; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

613 0

लातूर : रुग्णालयांमध्ये अनेकदा हलगर्जीपणामुळे काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. वेळेत उपचार न मिळाल्याने किंवा चुकीच्या उपचारांमुळे रुग्ण दगावल्याच्या घटना आपण पाहिल्या किंवा ऐकल्या असतीलच. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये रुग्णाला चक्क सुरक्षा रक्षक इंजेक्शन आणि सलाईन लावत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वाला या गावचे रहिवाशी शब्बीर शेख हे अपघातात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांना वॉर्ड क्रमांक 27 मध्ये दाखल करण्यात आले होते. या वेळी त्यांना डॉक्टर तपासून गेले. यावेळी डॉक्टरांनी नर्सला सलाईन आणि इंजेक्शन देण्याचे निर्देश दिले. मात्र त्या नर्सने चक्क सुरक्षा रक्षकाला सलाईन आणि इंजेक्शन देण्यासाठी सांगितले. यावेळी सुरक्षा रक्षक उपचार करत असताना पेशंट च्या नातेवाईकांनी विरोध ही केला मात्र सुरक्षा रक्षक उपचार त्यांचे काही न ऐकता उपचार करतच राहिला.

या प्रकरणी पेशंटच्या नातेवाईकांनी याबाबत डॉक्टरकडे तक्रार केली. तेव्हा डॉक्टरांनी येऊन उपचार केले आणि नर्ससह सुरक्षा रक्षक यांना झापले. या प्रकरणाची गंभीर दखल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ उदय मोहिते यांनी घेतली आहे. या प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Share This News

Related Post

Worms

Pune News : पुणे विद्यापीठातील धक्कादायक प्रकार ! विद्यार्थ्यांच्या जेवणात सापडल्या अळ्या

Posted by - September 8, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह (Pune News) क्रमांक 8 मधील मुलांच्या मेसच्या जेवणात अळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी…

‘हिजाब’ प्रकरणी नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई काय म्हणते ?

Posted by - February 9, 2022 0
उडुपी- कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात कॉलेजमध्ये हिजाब घालून येण्यावरून वाद चिघळला. त्यावरून कर्नाटकमध्ये आंदोलन उसळले. आता या वादामध्ये नोबेल शांतता पारितोषिक…
Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : खळबळजनक ! अपहरण केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा आढळला मृतदेह

Posted by - December 16, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar Crime News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये तरुण शेतकऱ्याचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात…
Viral Video

Viral Video : चुकीचं इंजेक्शन देऊन रुग्णालयाबाहेर काढलं अन्… आई-वडिलांसमोर तडफडत मुलीने सोडला जीव

Posted by - October 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याकडे डॉक्टर म्हणजे देवदूत मानला जातो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत…
Ajit Pawar

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

Posted by - February 1, 2024 0
  मुंबई, दि. 1 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *