Latur News

Latur News : हिटरचे पाणी अंगावर पडल्याने दोन मुली गंभीर जखमी

369 0

लातूर : लातूर शहरातून (Latur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये झोपेत असलेल्या दोन मुलींच्या अंगावर हिटरचे पाणी पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. लातूरच्या (Latur News) कव्हा गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही मुलींवर सध्या उपचार सुरु आहेत.

काय घडले नेमके?
लातूरच्या कव्हा येथील नामदेव शेळके यांच्या घरात हिटरचे गरम पाणी अंगावर पडल्याने 11 वर्षीय मुलगी माहेश्वरी आणि 13 वर्षीय योगेश्वरी ह्या जखमी झाल्या आहेत. दोघेही 50 ते 60 टक्के भाजल्या आहेत. दोन्ही चिमुकल्या मुली झोपेत असताना हिटरमधील गरम पाणी पडले. त्यामुळे दोघीही भाजल्या. त्यानंतर जखमी मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शेळके कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

रुग्णालयात उपचारासाठी पैसे लागत असल्याने शेळके यांच्या मदतीला गावकरी धावून आले आहेत. कव्हा येथील गावकऱ्यांनी तसेच दिशा फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. कव्हा ग्रामस्थांनी पैसे जमा करुन शेळके यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!