Latur Accident

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

684 0

लातूर : राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणाचा वाढतच चालले आहे. अशीच एक अपघाताची घटना लातूर-नांदेड महामार्गावर (Latur Accident) घडली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर 2 जण जखमी झाले आहेत. हा अपघात नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडला.

कसा झाला अपघात?
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके, शुभम किशोर लंकाढाई हे चौघे तरुण स्विफ्ट डिझायर कारने तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते.दरम्यान, चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवारात कार आली असता, कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातरच कार समोरून जात असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरक्षा चक्काचूर झाला.

हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये मोहन बालाजी कोतवाल (वय 27) शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई (वय 26) कृष्णा विठ्ठल मंडले (वय 24) आणि नर्मन राजाराम कात्रे (वय 33) यांचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण नांदेड जिल्ह्यातील रहिवासी होते. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!