Pune Koyta Gang

Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगची पुन्हा दहशत; हल्ल्यात 1 जण जखमी

2186 0

पुणे : पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीचे (Pune Koyta Gang) प्रमाण खूप वाढले आहे. आजकाल लोक किरकोळ भांडणावरुन एकमेकांच्या जीवावर उठतात. दहशत पसरवणाऱ्या (Pune Koyta Gang) अशा अनेक घटना समोर येत असतात. पुण्यामध्ये याचे प्रमाण सध्या जास्त आहे. पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत पहायला मिळाली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातील हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीचा तुफान राडा घडल्याची घटना समोर आली आहे. कॉलेजमधील झालेल्या किरकोळ वादानंतर कोयता टोळीच्या आठ ते दहा जणांनी हातात कोयते घेऊन हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत तरुणावर कोयत्यानं हल्ला केला. या हल्ल्यात 23 वर्षीय तरुण जखमी झाला आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोयता गॅंगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत पुण्यातून अशा अनेक घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!