रायगड : सध्या सोशल मीडियावर एक भीषण अपघाताचा व्हिडिओ (Accident Video) व्हायरल होत आहे. ही घटना उरणमध्ये घडली आहे. यामध्ये (Accident Video) भरधाव ट्रकनं चार जणांना उडवलं आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय घडले नेमके?
भरधावं ट्रकनं चार जणांना उडवलं आहे. या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना उरणमधील चिरले गावाजवळ गंगा रसोई हॉटेल समोरील सर्विस रोडवर घडली आहे.
उरणमध्ये भीषण अपघात; ट्रकने 4 जणांना उडवले pic.twitter.com/qLaSqo9Q5e
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) August 26, 2023
दरम्यान ही भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहेत की, 4 व्यक्ती सर्विस रोडवरून चालत जात होते. तेवढ्यात मागून आलेल्या ट्रकनं त्यांना उडवलं. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.