Kolhapur Crime

Kolhapur Crime : ‘या’ कारणामुळे कामावरून काढले; त्याचा राग मनात धरत आरोपीने उचलले ‘हे’ पाऊल

851 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur Crime) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून ठेवल्यानंतर मालकीणीकडेच वाईट नजरेने पाहू लागल्यामुळे मालकिणीने त्याला कामावरून काढून टाकले. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने तिचा काटा काढला. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील घुणकी या गावामध्ये ही घटना घडली आहे. सुषमा अशोक सनदे ( वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. सुनील गणपती जाधव (रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
सुनील जाधव हा सनदे यांच्या ट्रॅक्टरवर चालक होता आणि त्याचबरोबर तो सराईत गुन्हेगार सुद्धा आहे. पुण्यामध्ये त्याच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यानेच हा खून केल्याचे स्पष्ट झाले.सुषमा गुरुवारी गुरांना घेऊन चालण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे त्या दिवसभरात परत न आल्याने शोध सुरू करण्यात आला. यादरम्यान त्यांचा ऊसाच्या फडामध्ये मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली.

मृत सुषमावर होती वाईट नजर
या हत्येप्रकरणी मृत सुषमा यांचे पती अशोक सनदे यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. ते म्हणाले सनदे यांच्या ट्रॅक्टरवर दोन वर्षांपूर्वी सुनील हा ड्रायव्हर होता आणि तो सुषमा यांच्याकडे वाईट नजरेने पाहू लागला होता. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे याच रागातून त्याने ही हत्या केली असल्याचे अशोक यांनी म्हंटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनीलला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सुषमा यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, असा परिवार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!