Junnar Accident News

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

685 0

पुणे : कल्याण नगर महामार्गावर जुन्नर (Junnar Accident News) तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास 3 वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक पिकअप आणि रिक्षा यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये 5 पुरुष, 1 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की सर्व वाहनांचा चक्काचुर झाला आहे.

डिंगोरे येथील अपघाताची ही माहिती समजतात ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व मृतदेह स्थानिकांच्या मदतीने ओतूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले. या अपघातात पिकअप मधील एकाच कुटूंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये 4 वर्षाच्या मुलाचा आणि 6 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.

गणेश मस्करे ( वय 30), कोमल मस्करे ( वय 25 वर्ष ) हर्षद मस्करे (वय 4 वर्ष) काव्या मस्करे (वय 6 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. हे सगळे जुन्नर तालुक्यातील मढ पारगाव चे रहिवाशी आहेत. अन्य मृतांची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या अपघातामुळे काही काळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश

Chandrakant Patil : भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Ranbir Kapoor : ‘ॲनिमल’च्या पुढच्या भागात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!