Accident News

Accident News : लेन बदलण्याच्या नादात व्हॅनचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

430 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील काझीगुंड या ठिकाणाहून एका भीषण अपघाताचा (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये लेन बदलण्याच्या नादात एका व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. व्हॅनला ट्रकची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत लेव्हडोरा परिसरात हा भीषण अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
एका कुटुंबातील सदस्यांना घेऊन अपघातग्रस्त व्हॅन श्रीनगरहून जात होती. लेन बदलत असताना व्हॅन विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली आणि अपघात झाला. हा अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. अपघातामुळे व्हॅनमधील लोक महामार्गावर अक्षरक्षः फेकले गेले आणि गाडी उलटी झाली. अपघातामुळे इको वाहनातील सातही प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ काझीगुंड आपत्कालीन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यातील चौघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

मारूफ अहमद भट असे व्हॅनच्या चालकाचे नाव होते. मोहम्मद अब्दुल्ला यांचा मुलगा गुलाम कादीर भट, गुलाम कादिरचा मुलगा मोहम्मद नियाज भट, मुमताज अहमद भट, नियाज अहमद भट यांची पत्नी मुबिना बेगम, मोहम्मद नियाज यांची मुलगी मेहविश अख्तर असे सर्वजण व्हॅनने प्रवास करत होते. या अपघाताप्रकरणी काझीगुंड पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 279, 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!