Eknath Shinde

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर…’, ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

1186 0

मुंबई : बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याबद्दल (Eknath Shinde) एक मोठे वक्तव्य केले आहे. “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर भाजपकडून परिणाम भोगावे लागतील”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

नेमके काय म्हणाले बच्चू कडू?
एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारताच ते म्हणाले “असं होऊ शकत नाही. कारण असं केलं तर भाजपला त्याचा मोठा परिणाम भोगावा लागेल. आपण एकनाथ शिंदे यांना बाहेर काढलं, उद्या मुख्यमंत्री बदलले तर शिंदे यांचेही पाच-दहा टक्के मतं आहेत. ते सुद्धा नाराज होतील. त्यामुळे नाराजीच्या सुरात असणाऱ्यांची टक्केवारी वाढली तर तुमचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाहीत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!