नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी 7 आरोपींची सुटका करण्यात आली होती, त्यापैकी एका आरोपीचा बुधवारी मृत्यू झाला. त्याच्यावर चेन्नईच्या राजीव गांधी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. टी सुथेंद्रराजा उर्फ संथन (T Suthendraraja) असे मृत आरोपीचे नाव होते. राजीव गांधी हत्याकांडातील सात आरोपींपैकी संथन हा एक होता.
श्रीलंकन नागरिक असलेल्या संथनवर काही दिवसांपासून राजीव गांधी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयाचे जीन डॉ. वी. थेरानीराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 7.50 वाजता सेंथनचा अचानक मृत्यू झाला. डॉ. वी. थेरानीराजन यांनी संथन याचं यकृत खराब झालं होतं. बुधवारी सकाळी त्याला कार्डियाक अरेस्ट धक्का बसला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
कशी झाली राजीव गांधी यांची हत्या?
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 मध्ये एका निवडणूक रॅलीत बॉम्ब स्फोटाने हत्या करण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला होता. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) या श्रीलंकेतील सशस्त्र तमिळ फुटीरतावादी संघटनेने याची जबाबदारी घेतली होती. एलटीटीईला तत्कालीन सरकारची धोरणे पसंत नव्हती. यासाठी त्यांनी राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचला. ही हत्या घडली तेव्हा दक्षिण भारतात निवडणूक प्रचार सुरु होता. या प्रचारात कलैवानी राजरत्नम उर्फ धुन नावाची महिला रात्री साधारण 10.10 मिनिटांनी राजीव गांधी यांच्या पाया पडण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ गेली. तिच्या कपड्यांच्या आत आरडीएक्स स्फोटक होती. पाया पडताना तीने स्फोट घडवून आणला आणि यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. या भीषण स्फोटामध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
ST Employees : एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Madhuvanti Patankar : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक; मधुवंती पाटणकर यांचे निधन
Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात
Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती
Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर
Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर
Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी