Yavatmal News

Yavatmal News : ‘त्या’ शिक्षिकेची मृत्यूशी असणारी झुंज अखेर संपली

3011 0

यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये शिकवणी वर्गाकडे निघालेल्या तरूण शिक्षिकेस एका ट्रकने धडक दिली होती. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तिच्या उपचारासाठी 15 ते 20 लाखांचा खर्च सांगण्यात आला होता. ती मागच्या 8 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. अखेर आज तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ऐश्वर्या मधुसूदन बर्डे, (23, रा. हुनमान वार्ड, पुसद) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. 20 सप्टेंबर रोजी दुपारी ऐश्वर्या या दुचाकी (क्र. एमएच 29,बीएल 8906) ने शिकवणी वर्गाला जात होत्या. त्यावेळी पुसद येथील छत्रपती चौकात ट्रक (क्र= एमएच 12, एसएफ 9852) ने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि, त्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली पडल्या.

या अपघातात त्यांच्या पोटाला व पायाला जबर मार लागला. त्यांना आधी पुसद व नंतर हैद्राबाद येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर विविध शस्त्रक्रियांसाठी 15 ते 20 लाख रूपये खर्च सांगण्यात आला. नातेवाईकांकडून या रकमेची जुळवाजुळव सुरूअसतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ऐश्वर्याच्या मृत्यूने पुसद शहरात शोककळा पसरली आहे.

Share This News
error: Content is protected !!