Murder

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून गर्लफ्रेंडची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

7759 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्या (Murder) प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. अशाच प्रकारची एक घटना हैदराबादमध्ये (Hyderabad) घडली आहे. हैदराबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली आहे. हा आरोपी एवढयावरच थांबला नाहीतर त्याने तिच्या मृतदेहाचे दगड कापण्याच्या मशीनने तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रियकराला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
हैदराबादमध्ये 17 मे रोजी थिआगलगुडा रोडजवळील कचऱ्याच्या डब्यामध्ये एका महिलेचे डोके पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले आढळले होते. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बऱ्याच प्रयत्नानंतर हे महिलेचे असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या तपासात अनुराधा रेड्डी (Anuradha Reddy) असे या महिलेचे नाव असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी या खून प्रकरणाचा अधिक तपास करत बी. चंद्र मोहन (B. Chandra Mohan) याला अटक केली आहे. आरोपी बी. चंद्र मोहन हा अनुराधा रेड्डी बरोबर लिव्ह इनमध्ये राहत होता.

‘या’ कारणातून केली हत्या
बी.आर. चंद्र मोहन शेअर बाजारात ऑनलाइन ट्रेडिंगचे काम करत होता. मृत महिला आणि आरोपी दोघेही गेल्या 15 वर्षांपासून एकत्र राहत होते. मृत महिला पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर ती चंद्रमोहन याच्यासोबत चैतन्यपुरी कॉलनी, दिलसुखनगर या ठिकाणी राहत होती. अनुराधा रेड्डी ही व्याजावर पैसे देत होती. मोहनने तिच्याकडून सुमारे 7 लाख रुपये घेतले होते. ही रक्कम तो परत करू शकला नाही. यानंतर अनुराधा रेड्डीने त्याच्यामागे पैशांचा तगादा लावला. याच रागातून त्याने अनुराधा रेड्डीला संपवण्याचा निर्णय घेतला.

कशाप्रकारे केली हत्या?
12 मे रोजी चंद्रमोहनचे अनुराधासोबत जोरदार भांडण झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला कि चंद्रमोहनने तिच्या छातीवर आणि पोटावर वार करून तिची हत्या केली. यानंतर चंद्रमोहनने मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन लहान दगड कापण्याची मशीन खरेदी केली. त्यानंर या मशिनने त्याने अनुराधाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. त्यानंतर 15 मे रोजी चंद्रमोहनने अनुराधाचे कापलेले डोके कचऱ्याच्या डब्यात फेकले.

Share This News

Related Post

शिवाजी महाराजांचा असा अपमान आपल्याला सहन करायचा असेल तर… ! आणि उदयनराजेंना झाले अश्रू अनावर

Posted by - November 28, 2022 0
सातारा  : छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान सहन करण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी आगतिकता खासदार उदयनराजे भोसले…
Crime News

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Posted by - March 6, 2024 0
पाटणा : बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजप आमदाराच्या पुतण्याची भरदिवसा गोळी झाडून हत्या (Crime…
Solapur Crime

Solapur Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

Posted by - February 23, 2024 0
सोलापूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या (Solapur Crime) शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात…

एकनाथ शिंदे गटाला भाजपाची मोठी ऑफर ? शिंदे गटाला 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.…

#PUNE : पुण्यातील चांदणी चौकाचे 1 मे ला होणार लोकार्पण !

Posted by - March 13, 2023 0
पुणे : 2 ऑक्टोबर या दिवशी चांदणी चौकातील पूल ब्लास्ट करून पाडण्यात आला होता. या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून पुणेकरांनी प्रचंड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *