Nashik Accident

Nashik Accident : ओव्हरटेक करणे आले अंगलट! ST बसच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

645 0

नाशिक : राज्यात सध्या अपघाताचे (Nashik Accident) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. कधी कधी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात आपला गाडीवरील कंट्रोल सुटतो आणि अपघात होतो. अशीच एक अपघाताची घटना नाशिकमधून समोर आली आहे. यामध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी बसने अल्टो कारला धडक दिली. या भीषण अपघातात अल्टो कारमधील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.नाशिकमध्ये नांदगावजळ हा भीषण अपघात झाला आहे. एसटी चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

कसा घडला अपघात?
मनमाड बस डेपोची ही एसटी बस (एसटी क्रमांक एम एच 14 बीटी 4498) होती. चाळीसगाव येथून ही बस मनमाडच्या दिशेने प्रवास करत होती. यावेळी नांदगाव जवळ या एसटी बसने अल्टो कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात केला. पळसे येथून भडगाव कडे जात असलेल्या अल्टो कारला एसटी बसने धडक दिली. एसटी बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात अल्टो कारमधील दोन महिलांसह एक पुरुष प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर या कारमधील एक तीन वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी तातडीने नाशिक येथे हलवण्यात आले आहे.

शुभम संतोष नलावडे (वय वर्षे 24), वंदना संतोष नलावडे, (वय वर्षे 40) आणि निकिता मनोज शिंदे ( वय वर्षे 22) अशी मृतांची नावे आहेत. यावेळी नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे सह हवालदार संदीप बच्छाव पोलिस नाईक नंदू चव्हाण ठाणे अंमलदार राजेंद्र मोरे सह मुददसर शेख घटना स्थळी हजर होवून पंचनामा केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेले भावेश भिंडे नेमके कोण आहेत?

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बुधवारी मुंबईत होणार रोड शो

Manoj Jarange Patil : निवडणूक संपण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Pune Loksabha : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Beed News : मतदान केंद्राबाहेर गोंधळ, उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा तरीही विक्रमी मतदान!

Ahmednagar News : वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सत्य समोर येताच सगळेच हादरले

Sushma Andhare : “राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत”, सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना दिले ओपन चॅलेंज

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात; 4 जण जखमी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!