Nagpur Accident

Nagpur Accident : दुचाकीवरील दोघांना धडक दिल्यानंतर कारने 3 KM पर्यंत फरफटत नेली बाईक

3919 0

नागपूर : राज्यात अपघातांच्या प्रमाणात (Nagpur Accident) वाढ झाली आहे. यामध्ये (Nagpur Accident) काही अपघात एवढे भयंकर असतात कि काही लोकांना जागीच आपला जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना आता नागपूरमधून समोर आली आहे. यामध्ये बाईकला धडक दिल्यानंतर कार चालकाने अतिशय धक्कादायक कृत्य केलं. त्याने 3 KM पर्यंत बाईक फरफटत नेली. नागपूरच्या राजीव नगर परिसरात ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
दोन तरुण प्राइड हॉटेलकडे बाईकवरून जात असताना या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. कारची धडक इतकी जबर होती, की हा अपघात झाल्यावर दुचाकीवरील दोघंही रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. मात्र, या अपघाताच तरुणांची दुचाकी मात्र कारच्या खालील भागात अडकली. बाईक कारला अडकली असताना देखील कारचालक थांबला नाही. चिंच भवनपर्यंत तीन किलोमीटर ही बाईक कार चालकाने फरफटत नेली.

मागील एका वाहनावरील व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओही काढला. हा व्हिडिओ समोर येताच नागपूर पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे. सुदैवाने या घटनेमधील दोन तरुणांचा जीव वाचला. मात्र, या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!