Gondia

धक्कादायक ! झोपलेल्या मायलेकावर धारदार शस्त्राने वार; मुलाच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू

12292 0

गोंदिया : गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या श्रीनगर येथील चंद्रशेखर वार्डामध्ये काल बुधवारी पहाटे 3 वाजता अज्ञात व्यक्तीने आई आणि मुलावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत आईचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गोंदिया शहर हादरलं आहे.

संध्या महेंद्र कोरे (वय 48) (Sandhya Mahendra Kore) असं मृत महिलेचे नाव आहे तर करण महेंद्र कोरे (24) (Karan Mahendra Kore) असं गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय घडले नेमके?
संध्या कोरे आणि त्यांचा मुलगा करण हे दोघेही घरात झोपले असताना अचानक अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर ते दोघे किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. या घटनेत संध्या कोरे यांचा मृत्यू झाला तर मुलगा करण गंभीर जखमी झाला. संध्या यांच्या शरीरावर पाच ते सह जखमा आढळून आल्या आहेत. या घटनेत मुलगा करण हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!