Nashik Dead

धक्कादायक ! विहिरीत पडून साडेचार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

844 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) एक मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या मोहाडी या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये खेळत असताना सार्वजनिक विहिरीत पडून साडेचार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू (Dead) झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिशांत अजय गोवर्धने (वय 4 वर्ष 6 महिने, रा. मखमलाबाद रोड, मधुबन कॉलनी, पंचवटी) असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. हा चिमुकला खेळता खेळता मोहाडी गावच्या स्मशानभूमी परिसरातील सार्वजनिक विहिरीजवळ गेला. यादरम्यान अचानक त्याचा तोल गेला आणि तो विहिरीच्या पाण्यात पडला. विहिरीच्या खोल पाण्यात पडल्याने दिशांतचा बुडून मृत्यू झाला.

यानंतर या घटनेची माहिती बापू गोवर्धने (Bapu Govardhan) यांनी दिंडोरी पोलिसांना दिली. दिंडोरी पोलीस (Dindori Police) ठाण्यात दिशांतच्या आकस्मिक मृत्यूची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गोवर्धने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!