Jalgaon Crime

Jalgaon Crime : जळगाव हादरलं ! भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या

623 0

जळगाव : जळगावमधून (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करण्यात आला आहे. बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास धावत्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार केला. यात दोघांनाही गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले होते. भुसावळ शहरातल्या जळगाव नाका मरी माता मंदिराजवळ ही घटना घडलीय. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने भुसावळ शहर हादरले आहे.

या हत्याकांडाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. सध्या भूसावळ शहरात तणावाचे वातावरण असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!