Ind Vs Pak

T20 World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट; टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ

2674 0

मुंबई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup) ला 2 जून पासून सुरुवात होणार आहे. तर या स्पर्धेतील बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. दहशतवादी संघटनेच्या इस्लामिक स्टेटने न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या भारत- पाकिस्तान सामन्या दरम्यान हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यूयॉर्कचे गवर्नर कैथी होचुल यांनी पोलिसांना सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिलेले आहेत. तर आयसीसीने सुद्धा सुरक्षा ही आपली पहिली प्राथमिकता असून याबाबत कोणतीही हयगय केली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.

यंदाचा टी 20 वर्ल्ड कप हा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडणार आहे. भारत- पाकिस्तान हा बहुप्रतीक्षित सामना हा न्यूयॉर्क येथे होणार असून यासाठी टीम इंडियाची टीम अमेरिकेला रवाना झालेली आहे. न्यूयॉर्कच्या आइजनहावर पार्क स्टेडियमवर भारत- पाकिस्तान सामना होणार असून हा स्टेडियम मैनहट्टन पासून 25 मील दूर आहे. याच स्टेडियमवर वर्ल्ड कपचे आणखीन 8 सामने होणार आहेत. तर या स्टेडियमची क्षमता ही 30 हजार प्रेक्षक बसतील एवढी आहे. 1 जून रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारा वॉर्मअप सामना सुद्धा स्टेडियमवरच खेळवला जाणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jalgaon Crime : जळगाव हादरलं ! भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!