Satara News

Satara News : इन्स्टाग्रामवरची खुन्नस रस्त्यावर निघाली; डॉल्बी स्पर्धेत बंदुका, तलवारी नाचवून तरुणांची हुल्लडबाजी

569 0

सातारा : साताऱ्यामधून (Satara News) एक मोठी बातमी समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या वादानंतर लावलेल्या पैजेवरुन कुणाच्या डॉल्बीचा आवाज मोठा वाजतो, यावरुन बुधवारी रात्री साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजजवळ डॉल्बी वाजवण्याची स्पर्धा लावण्यात आली होती. या पैजेनुसार दोघेही डॉल्बीधारक आपापली समर्थक मुले व सिस्टीम घेऊन महामार्गावर जमले. त्यानंतर दोघांनी आपापल्या डॉल्बीचा मोठ्याने आवाज करून समर्थकांसह धिंगाणा सुरू केला. यादरम्यान दोन्ही गटांकडून बंदुका, तलवारी, कोयते अशी धारदार शस्त्रे नाचविण्यात आली. या प्रकरणी सुमारे 50 जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय संपूर्ण प्रकरण?
साताऱ्यातील कोडोली व मेढ्यातील दोन डॉल्बी व्यवसायिकांमध्ये इंस्टाग्रामवर डॉल्बीच्या आवाजावरून पैज लावली होती. कोणाची डॉल्बी सिस्टीम सर्वात जास्त वाजते, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी या दोन डॉल्बीचालकांनी साताऱ्यातील लिंबखिंड परिसरात असलेल्या गौरीशंकर कॉलेजजवळ राष्ट्रीय महामार्गावर डॉल्बी स्पीकर वाजवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. ही डॉल्बीची स्पर्धा मोठमोठ्या आवाजात सुरू असतानाच काही हुल्लडबाज तरुणांनी डॉल्बीच्या ठेक्यावरच चक्क बंदुका, तलवारी व कोयते नाचून साताऱ्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच सातारा तालुका पोलिसांनी संबंधित घटनास्थळी जाऊन या घटनेची शहानिशा करून दहशत माजवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले.डॉल्बी वाजवण्याच्या स्पर्धेत तरुणांनी डॉल्बीच्या ठेक्यावर चक्क बंदुका, तलवारी व कोयता नाचून साताऱ्यात दहशत माजवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत बंदुका, तलवारी व कोयते नाचणाऱ्या संशयित सात जणांना तात्काळ अटक केली आहे, तर फरारी संशयित आरोपींचा तपास सुरू केला आहे.

याप्रकरणी सुमारे 50 जणांवर शस्त्रबंदी कायदा, बेकायदा जमाव जमवणे व विनापरवाना सिस्टीम लावणे अशा कलमानुसार सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास तालुका पोलीस करत आहेत, अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास घोडके यांच्याकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा

Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती

Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल

Wardha Accident : वर्ध्यात कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात

Viral Video : खतरनाक ! पिसाळलेल्या बैलाने घरात घुसून महिलांना उडवले

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide