नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही महिण्यापुर्वी दिल्लीतील (Delhi Crime) श्रद्धा वालकर हत्याकांड आणि मीरा भायंदर सरस्वती वैद्य हत्याकांड या घटना ताज्या असताना आता दिल्लीमध्ये (Delhi Crime) गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आहेत. हा मृतदेह एका महिलेचा असून या महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.
#WATCH | Delhi Police recovers the body of a woman, chopped into several pieces from near Geeta Colony flyover area. Police present at the spot.
More details are awaited. pic.twitter.com/F68RdUaifx
— ANI (@ANI) July 12, 2023
आठवडाभरापूर्वी अशीच घडली होती घटना
मागच्या आठवड्यात दिल्ली पोलिसांना (Delhi Crime) सफदरजंग हॉस्पिटलच्या मागे जंगलात एका कुजलेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. हा मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी 174 CrPC अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मृतदेह सुमारे 15 दिवसांचा असल्याचे सांगण्यात येत असून मृतदेहावर मीठ टाकण्यात आले होते, त्यामुळे त्याची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.