Crime News

Crime News : जन्मदाता बाप वाईट नजरेने बघायचा म्हणून पोटच्या लेकीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

747 0

जांजगीर चांपा : छत्तीसगडमध्ये बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना (Crime News) उघडकीस आली आहे. यामध्ये पोटच्या मुलीने वडिलांना दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत जन्मदात्या बापाचा जागीच मृत्यू झाला आहे. तिने हे पाऊल उचलण्यामागेचे कारणही तेवढेच धक्कादायक होते. वडील सतत वाईट नजरेने पाहायचे आणि स्पर्श करायला यायचे, म्हणून मुलीने हे टोकाचे पाऊल (Crime News) उचलले आहे.

Accident : नाशिकमध्ये समोरासमोर धडक होऊन एसटी ट्रकचा भीषण अपघात

तिल्दा नेवारा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बिलाडी गावामध्ये ही धक्कादायक घटना (Crime News) घडली आहे. मृत व्यक्तीच्या मुलाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी वडील बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Rahul Kalate : राहुल कलाटे यांनी घेतली उदय सामंत यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

मृत व्यक्तीला 9 मुली आणि एक मुलगा आहे. पोलिसांनी याबाबत कुटुंबियांकडे चौकशी केली असता मृताची तिसरी मुलगी कल्पना भारती घाबरली. यानंतर पोलिसांना तिच्यावर संशय आल्याने तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता मुलीने आपला गुन्हा (Crime News) कबूल केला. या हत्येप्रकरणी कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवून कल्पना भारती हिला अटक करण्यात आली. तसेच तिने वडिलांना ज्या दांडक्याने मारले तो दांडकाही पोलिसांनी जप्त केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!