बारामती : बारामतीमधील (Baramati News)उच्चभ्रू वस्तीत एकाच रात्रीत 16 फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली आहे. कारमधून आलेल्या (Baramati News) चोरट्यांनी एक दोन नव्हे तर 16 फ्लॅट फोडल्याने खळबळ उडाली आहे. अशोकनगर परिसरातील अकल्पित सोसायटी आणि आजूबाजुच्या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला.
नेमकी काय घडलं?
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कार मधून 5 ते 6 जणांची टोळी आली होती. पहाटे 3 ते 4 च्या सुमारास त्यांनी अशोक नगर परिसरातील बंद असलेले 16 फ्लॅट कुलूप व कडी कोयंड्यांनी तोडले. यात एकूण 25 तोळे सोने आणि एक लाख रुपयांची चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
दबक्या पावलांनी आले अन् 16 फ्लॅटची शिकार करून गेले pic.twitter.com/J0pV0Iri69
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) August 18, 2023
कार मधून 5 ते 6 जणांची टोळी आली होती. त्यांनी 16 फ्लॅट फोडले असून 25 तोळे सोने आणि एक लाख रुपये रोकड चोरी केली. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट बोलावले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपींचा शोध घेऊन चार पथके रवाना करण्यात आले आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्याकडून देण्यात आली आहे.