Pune Crime

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं ! प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांकडून बहिणीची हत्या

619 0

छत्रपती संभाजीनगर : आपण सगळ्यांनी नागराज मंजुळेंचा सैराट हा चित्रपट पहिलाच असेल. त्यामध्ये दाखवलेल्या कथेची पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) पाहायला मिळाली. या घटनेमुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे. यामध्ये प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी आपल्या बहिणीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात ही संतापजनक घटना घडली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
चंद्रकला बावस्कर असे मृत तरुणीचे नाव आहे. त्यांचे प्रेमसंबंध असल्याचा तिच्या आई-वडील आणि भावांना संशय होता. दरम्यान, शनिवारी सकाळी राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह (वय 30 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) हे शनिवारी आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी तिथे अचानक चंद्रकला बावस्कर धावत आल्या. प्रचंड घाबरलेल्या चंद्रकला यांनी ‘माझे भाऊ आणि आई वडील प्रेमसंबंधांच्या कारणावरून माझा जीव घेणार आहे. त्यामुळे, मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी त्यांनी शमीम यांच्याकडे विनवणी केली. त्यामुळे शमीम यांनी तिला त्यांच्या बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले.

यानंतर काही वेळाने चंद्रकला यांचे भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर हे दोघे तिथे धावतच आले. त्यांच्या हातात कुऱ्हाड होती. त्यांनी शेडमध्ये चंद्रकला यांचा शोध घेतला. आणि त्यांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या हातात कुऱ्हाड होती. त्यांनी त्या कुऱ्हाडीने तिच्यावर वार केले. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर यांचा समावेश आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!