Rape

Chhatrapati Sambhajinagar : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; DNA चाचणीमधून धक्कादायक माहिती आली समोर

1433 0

छत्रपती संभाजीनगर : आपल्याकडे बहीण- भावाचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. मात्र काही लोकांमुळे या नात्याला बदनाम केले जाते. याच नात्याला काळिमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) समोर आली आहे. यामध्ये सख्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीशी अनैतिक संबंध ठेवले. DNA चाचणीतून या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणी पीडितेच्या भावासह मावस भावजीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित मावस भावजीवरील आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी त्याला जामीन मंजूर केला आहे.

Pimpari – Chinchwad : धक्कादायक! भर पावसात रस्त्यावर आढळले 2 दिवसांचं अर्भक; पिपंरी-चिंचवडमध्ये उडाली खळबळ

काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मावस भावजीने ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्यासोबत शरीर संबंध ठेवल्याचे म्हटले आहे. 24 मार्च 2023 रोजी पीडितेने पुरवणी जबाबात म्हटले आहे की, नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये दहा दिवस सख्खा भाऊ घरी आला होता. त्यादरम्यान सख्ख्या भावाने शरीर संबंध ठेवले आहे. त्यानंतर मासिक पाळी आली नसल्यास संपूर्ण प्रकार आईला सांगितल्यानंतर प्रेग्नेंट किटने तपासणी केली असता यामध्ये मुलगी गरोदर असल्याचे लक्षात आलं. ही बाब भावाला सांगितल्यानंतर त्याने एका सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी केल्यानंतर चार महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले.

Yawatmal News : मुसळधार पाऊसामुळे घराची भिंत पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

बहिण गर्भवती ही बाब उघडकीस येऊ नये यासाठी त्याने बहिणीला धमकी दिली. जर ही कुणाला सांगितली तर मी जीव देईल”, अशी धमकी देत “या प्रकरणामध्ये माझं नाव न घेता दुसऱ्या कुणाचेही नाव घे”, अशी धमकी भावाने बहिणीला दिली. असं पीडितने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!