Crime News

Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव

328 0

चेन्नई : वृत्तसंस्था – चेन्नईतील एक महिला चौथ्या मजल्यावरील गॅलरीत सात महिन्यांच्या (Crime News) मुलीला स्तनपान करत होत्या. नंतर त्यांची मुलगी हातातून निसटून पहिल्या मजल्यावरील पत्र्यावर पडली. 15 मिनिटांच्या संघर्षानंतर लोकांनी तिला वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी लोकांनी चिमुकलीच्या आईला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. स्थानिक टीव्ही चॅनल्सनेही तिचे वर्णन निष्काळजी आई असे केलं होतं. याच ट्रोलिंगला कंटाळून चिमुकलीच्या आईने आत्महत्या केली आहे.

काय घडले नेमके?
ट्रोलिंगमुळे त्रासलेल्या रम्या दोन आठवड्यांपूर्वी पती आणि दोन मुलांसह कोईम्बतूर येथे माहेरी आल्या. रविवारी रम्याचे आई-वडील आणि पती लग्नाला गेले होते. ते घरी परतले तेव्हा त्यांना रम्या मृत दिसल्या. रम्या या चेन्नईमध्ये आयटी प्रोफेशनल होत्या. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंकर अनेकांनी निष्काळजी आई म्हणत रम्याला ट्रोल केले. या सर्व प्ररकारानंतर रम्या डिप्रेशनमध्ये गेली. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. घटनेच्या एका महिन्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide