Cattle Smugglers

Cattle Smugglers : गोवंश तस्करांचा गोरक्षकांवर गंभीर हल्ला; 1 जणाचा मृत्यू

659 0

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामधील अप्पारावपेठ इथं एक धक्कादायक घटना घडली आहे .गोवंश तस्कारांनी (Cattle Smugglers) गोरक्षकांवर शस्त्रांनी गंभीर हल्ला केला. या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा गंभीर जखमी झाले आहेत.

Video : काळी जादू केल्याच्या संशयावरून जोडप्याला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

शिवणी येथील गोरक्षक दलाचे कार्यकर्ते तेलंगणातील एक कार्यक्रम आटोपून गावी परत येत होते. त्यावेळी त्यांना एक संशयित बोलेरो पिकअप गाडी दिसली. त्यामुळे गोरक्षकांनी गाडी थांबवल्यामुळे, गाडीतील हल्लेखोरांनी (Cattle Smugglers) थेट गोरक्षकांवर हल्ला चढवला.

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये आला नवा ट्विस्ट; ‘त्या’ कॉलने वाढवला सस्पेन्स

या हल्यात (Cattle Smugglers) शेखर रामलु रापेल्ली हा गोरक्षक ठार झाला. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. गोरक्षक पळून जाऊ नये म्हणून हल्लेखोरांनी गोरक्षकांच्या गाडीचे टायरही धारदार शास्त्राने फोडले.

Share This News
error: Content is protected !!