Murder Sangli

‘त्या’ वस्तूने केला घात; रागाच्या भरात भावजयीकडून दिराची हत्या

717 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli) दीर आणि भावजयीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तासगाव शहरातील इंदिरानगमध्ये तरुणाची चाकूने वार करून हत्या (Murder) करण्यात आली आहे. सुरज उर्फ लल्या दिनकर शिंदे (वय 30 वर्षे) (Lalya Dinkar Shinde) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही हत्या भावजय, पुतण्या, आणि अन्य दोघे अशा चार जणांनी मिळून केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
घरातील एक वस्तू घेऊन गेल्याचा राग मनात धरून, सुरज उर्फ लल्या दिनकर शिंदे याची चौघांनी चाकूने वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडली आहे. सुरज उर्फ लल्यावर गळ्याजवळ, खांद्याच्या मागे, डाव्या हाताच्या दंडावर व उजव्या खांद्याजवळ चाकूने वार करण्यात आले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावजयी जानकी दिपक शिंदे (Janaki Deepak Shinde) आणि तिचा मुलगा गोपाळ दिपक शिंदे (Gopal Deepak Shinde) या दोघांना अटक केली आहे तर जतीन (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि अजय जाधव हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

Share This News

Related Post

चांदणी चौक पूल 1 व 2 ऑक्टोबर दरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार ; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - September 27, 2022 0
पुणे : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट…

#C-Vigil App : निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा

Posted by - February 4, 2023 0
पुणे : निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत…

अहमदनगरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी, वाहने जाळली

Posted by - April 5, 2023 0
अहमदनगर जवळील वारूळवाडी गावात दोन गटात मंगळवारी रात्री दोन गटामध्ये झालेल्या हाणामारीनंतर जमावाने रस्त्यावर उतरून काही ठिकाणी दगडफेक ,तर काही…

ड्रायव्हर मला त्रास देतोय… वाचवा! पीएमपीएमएल बसमधील एका प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल…

Posted by - October 15, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पीएमपीएमएल बसमधील एका प्रवाशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सुरुवातीला हा व्हिडिओ पाहूयात… पाहिलंत, मानसिक संतुलन…

राज्यात सर्वत्र मंगल होण्यासाठी साडेतीन पीठाचे दर्शन ; नाशिकमधील पर्यावरण विषयाचा पाठपुरावा करणार : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - September 28, 2022 0
नाशिक : महाराष्ट्रात मुलींचे अपहरण, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अनेक चांगल्या योजनांना स्थगिती दिलेली आहे. राष्ट्रीय अहवालानुसार अपहरणाच्या क्षेत्रात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *