Murder Sangli

‘त्या’ वस्तूने केला घात; रागाच्या भरात भावजयीकडून दिराची हत्या

788 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli) दीर आणि भावजयीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तासगाव शहरातील इंदिरानगमध्ये तरुणाची चाकूने वार करून हत्या (Murder) करण्यात आली आहे. सुरज उर्फ लल्या दिनकर शिंदे (वय 30 वर्षे) (Lalya Dinkar Shinde) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही हत्या भावजय, पुतण्या, आणि अन्य दोघे अशा चार जणांनी मिळून केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
घरातील एक वस्तू घेऊन गेल्याचा राग मनात धरून, सुरज उर्फ लल्या दिनकर शिंदे याची चौघांनी चाकूने वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडली आहे. सुरज उर्फ लल्यावर गळ्याजवळ, खांद्याच्या मागे, डाव्या हाताच्या दंडावर व उजव्या खांद्याजवळ चाकूने वार करण्यात आले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावजयी जानकी दिपक शिंदे (Janaki Deepak Shinde) आणि तिचा मुलगा गोपाळ दिपक शिंदे (Gopal Deepak Shinde) या दोघांना अटक केली आहे तर जतीन (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि अजय जाधव हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!