Vasai Accident

Vasai Accident : वसईमध्ये कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

2205 0

वसई : राज्यात सध्या अपघाताचे (Vasai Accident) प्रमाण खूप वाढत आहे. रोज कुठे ना कुठे अपघात होताना दिसत आहे. आज सकाळी 6 च्या सुमारास वसई येथील (Vasai Accident) सातीवली पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. आज सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातिवली पुलावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

ही अपघातग्रस्त कार एवढी स्पीडमध्ये होती कि ती दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2 जखमी झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!