Buldhana News

Buldhana News : ‘समृद्धी’ महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जखमी

593 0

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर (Buldhana News) डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये भरधाव कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये नागपूर येथील चौघांचा समावेश आहे. आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

नागपूर येथील सुवर्णा चंद्रशेखर शेलोरे (28) चंद्रशेखर गजानन शेलोरे (30) कुणाल अरुण ठाकरे,शिवांश चंद्रशेखर शेलोरे (वय अडीच वर्ष ) व भुपेंद्र युवराज पटेले (राहणार पुणी, बालाघाट मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अमरनाथ नागरे व सहकाऱ्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पहिले मेहकर व त्यानंतर नागपुर येथे पुढील उपचारासाठी पाठविले.

हे पण वाचा
Amravati Accident News : एक डुलकी 14 जणांच्या जीवावर बेतली! दीक्षाभूमीवर जाणाऱ्या अनुयायांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Gadchiroli News : घातपात कि अपघात ? बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अचानक आढळला मृतदेह

Satara News : साताऱ्यात भीषण अपघात ! पोलिसांच्या गाडीने चौघांना उडवलं

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!