Dhule Bus Accident

Bike Accident : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

671 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक (Bike Accident) बातमी समोर आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या वरठाण तिडका रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सुनील विक्रम बागुल आणि काशिनाथ विठ्ठल पाटील असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोन जणांची नावे आहेत.

काय घडले नेमके?
पाचोरा तालुक्यातील सारवे पिंप्री येथील काशीनाथ येवले व राहुल त्रंबक शिंदे हे दोघे दुचाकीने सारवे पिंप्रि येथुन कींन्ही येथे जात होते, तर सोयगाव तालुक्यातील वाडीसुतांडा येथील सुनिल बागुल (वय, 28) व सतिष मोरे (वय-36) हे दोघे डीस्कवर गाडीवर वाडी येथुन तिडका गावाकडे जात असताना वरठाण तिडका रस्त्यावर दोघांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात सुनिल विक्रम बागुल (वय 23) रा.वाडी व काशीनाथ विठ्ठल पाटील (वय, 22 ) रा. पिंप्रि ता. पाचोरा हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेले राहुल त्र्यंबक शिंदे वय, 22 (रा सारवे पिंप्रिं) सतिष सखाराम मोरे (वय 36 रा, वाडीसुतांडा) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपनिरीक्षक रज्जाक शेख, जमादार संदीप सुसर,विकास दुबेले, श्रीकांत तळेगावकर तातडीने दाखल झाले. यानंतर त्यांनी जखमींना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Aditya Shrivastava : UPSC मध्ये अव्वल येणारा आदित्य श्रीवास्तव नेमका कोण आहे? कसा आहे त्यांचा प्रेरणादायी प्रवास?

Pune News : महापारेषणची वीजवाहिनी तुटली; पर्यायी व्यवस्थेतून सुमारे 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

AB Form : निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा ‘एबी फॉर्म’ नक्की असतो तरी काय?

Punit Balan : कंटेंट क्रिएटर्सनी देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे : पुनीत बालन

Pune Fire : पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग

Pune News : पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये देशातील पहिले मतदार केंद्र; पुणे प्रशासनाचा अनोखा उपक्रम

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News
error: Content is protected !!