क्राईमव्हिडिओ

Bike Accident : बाईक चालवताना 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; अपघाताचा Video आला समोर

मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांची फार दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना (Bike Accident) आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तसंच रस्ते चिकट झाल्याने वाहने स्लिप होऊन अपघात घडण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात घडत (Bike Accident) आहेत. अशीच एक अपघाताची घटना मंगलोरमध्ये घडली आहे. या अपघातात 21 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याची दुचाकी रस्त्यावरून स्लिप झाल्याने हा अपघात झाला आहे.

Sangli News : वडिलांना घरी थांबवून मोटर पाण्यात ठेवायाला गेला अन्.., 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

काय घडले नेमके?
दुचाकीची खांबाला जोरदार धडक बसल्याने त्या तरुणाला जीव गमवावा लागला. मोहम्मद नशाथ असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मोहम्मद उप्पला येथील रहिवासी होता. तसंच तो महाविद्यालयात अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. ही संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Raghuvir Ghat Kokan : कोकणातील रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद; पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय

या व्हिडिओमध्ये (Bike Accident) तुम्ही पाहू शकता कि, दुचाकीस्वार रस्त्यावरून वेगाने दुचाकी चालवत असताना वाहन स्लिप झाल्यावर त्याचा तोल जातो आणि समोरच्या खांबाला जाऊन धडकतो. ही धडक इतकी जोरदार होती कि तरुणाच्या डोक्यावरील हेल्मेटदेखील बाजूला फेकले जाते. आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू होता.