Bhiwandi Crime

डॉक्टरांचा हलगर्जीपणा ! चुकीचे इंजेक्शन दिल्याने चिमुरडीचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

7744 0

भिवंडी : भिवंडीमध्ये (Bhiwandi) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चुकीचे इंजेक्शन (Wrong Injection) दिल्यामुळे चार वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी चिमुरडीच्या मृत्यूस डॉक्टर, परिचारिका,रुग्णालय व्यवस्थापकास जबाबदार धरत रुग्णालयाची तोडफोड केली आहे. एवढेच नाहीतर त्यांनी डॉक्टर परिचारिका यांना मारहाणदेखील केली आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय घडले नेमके?
राम नगर परिसरात राहणारे नितीन कांबळे यांची चार वर्षीय मुलगी श्रद्धा (Shraddha Nitin Kamble) हिला उलट्या होत असल्याने तिला भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड येथील सनलाईट हॉस्पिटलमध्ये (Sunlight Hospital) उपचारासाठी दाखल केले. रात्री आठ वाजताच्या सुमारास श्रद्धा हीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रद्धाला सलाईनमधून इंजेक्शन देण्यात आले.त्यानंतर श्रद्धा बेशुद्ध पडून निपचित झाली व त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर श्रद्धाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यानंतर त्यांनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टर परिचारिकेला मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भोईवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात आणली व त्यानंतर श्रद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. इंजेक्शनचे तीन डोज लागोपाठ दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकाकांडून करण्यात आला आहे. तसेच डॉक्टरांवर कायदेशीर कारवाही करण्याची मागणीदेखील मृत चिमुकलीच्या नातेवाईकांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide