Jalgaon News

Jalgaon News : जळगाव हादरलं ! लेकाची हत्या करून बापाची आत्महत्या; धक्कादायक कारण आले समोर

69769 0

जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यामधील भडगाव तालुक्यातील शिवणी येथे पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना 27 जुलै रोजी घडली होती. या प्रकरणाचा (Jalgaon News) तपास केला असता जन्मदात्या बापानेच 12 वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. संजय साहेबराव चव्हाण (48) आणि कौशिक संजय चव्हाण (12) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत.

काय घडले नेमके?
चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी असलेले संजय साहेबराव चव्हाण हे त्यांच्या पत्नीला भाऊ नसल्याने सासुरवाडीला शिवणी येथे स्थायिक झाले आहेत. पत्नी साधनाबाई आणि दोन मुले असा संजय चव्हाण यांचा परिवार आहे. संजय चव्हाण यांचा मोठा मुलगा औषधशास्त्राचे शिक्षण घेऊन इंदोर येथे नोकरी करतो. तो अविवाहीत आहे. तर लहान कौशीक ऊर्फ समर्थ हा इयत्ता सहावीत शिकत होता. 27 जुलै रोजी संजय चव्हाण यांनी शेत्तात काम आहे सांगून त्यांच्यासोबत मुलाला शेतात नेले. पत्नी साधनाबाई यांना सुद्धा चव्हाण यांनी नेहमीप्रमाणे शेतावर येण्यास सांगितले आणि हे बापलेक पुढे निघाले.

एका आजीबाईंशी गप्पा मारण्यात वेळ गेल्यामुळे साधनाबाई यांना शेतात जाण्यास उशीर झाला. आजीबाई निघून गेल्यानंतर साधनाबाई शेतात पोहोचल्या, तर त्यांना शेतात निंबाच्या झाडाला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत तर मुलगा शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या खाटेच्या बंगळीवर निपचित पडलेला दिसला. हे सगळे पाहून साधनाबाई यांना मोठा धक्का बसला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणाची माहिती भडगाव पोलिसांना देण्यात आली. यानंतर भडगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली.

‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
मृत कौशिक हा घरातून पैसे घेत असल्याने आणि सारखा उलट उत्तरे देत असल्याने त्याचा राग वडील संजय यांना आला होता. त्यामुळे संजय यांनी कौशिक याला शेतात नेले. त्याठिकाणी त्यांनी रागाच्या भरात आपल्या मुलाची गळा आवळून हत्या केली. यानंतर स्वतः देखील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्या फिर्यादीवरून मृत बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!