Gadar 2 Fight

Gadar 2 : ‘गदर 2’ चित्रपटादरम्यान ‘मोदी झिंदाबाद’, ‘पाकिस्तान झिंदाबाद’ ‘या’ घोषणा दिल्यामुळे दोन गटांमध्ये तुफान राडा

895 0

सनी देओलचा बहुचर्चित ‘गदर 2: (Gadar 2) द कथा कंटिन्यूज’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट, 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ (Gadar 2) मधून सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी साकारलेली सकीना आणि तारा सिंगची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवडली आहे. मात्र गदर 2 च्या या यशाला गालबोट लावणारी एक घटना समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ‘गदर 2च्या शो दरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. काही लोकांनी हिंदुस्थान झिंदाबादच्या ऐवजी, मोदी झिंदाबाद व पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्याने हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.बरेलीतील प्रसाद टॉकीजमध्ये हा प्रकार घडला असून या चित्रपटगृहाच्या मालकांनी सुद्धा दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे मान्य केले आहे.

दरम्यान, 13 ऑगस्ट पर्यंत पहिल्या वीकएंडला ‘गदर 2 ने तब्बल 52 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाचे पहिल्या आठवड्याचे एकूण कलेक्शन 135 कोटींच्या पुढे गेले आहे. हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याने याचा फटका चित्रपटाच्या निर्मात्यांना बसला आहे हे मात्र नक्की…

Share This News
error: Content is protected !!